करोनाचा उद्रेक, 1 लाख लोक कचाट्यात, ‘या’ 2 जागी वेदना झाल्यास समजून जा तुम्हीही आहात करोना पॉझिटिव्ह..!

कोरोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) धोका कमी होताना दिसत नाहीये. सध्या भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची (Covid 4th wave) स्थिती कायम आहे. यावेळी कोरोनाची लक्षणे गंभीर नसली तरी कोरोनाच्या वाईट स्थितीसाठी जबाबदार असणारे ओमिक्रॉन आणि त्याचे व्हेरिएंट ba.2, ba.4 आणि ba.5 मध्ये निश्चितच वेगाने पसरण्याची क्षमता आहे. यामुळेच गेल्या काही आठवड्यात देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,34,52,164 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे आतापर्यंत 5,25,116 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या बदलत्या व्हेरिएंट्समुळे त्याच्या लक्षणांमध्येही झपाट्याने बदल होत आहेत. तसेच कोरोनाची तीन क्लासिक लक्षणे (covid classic symptoms) आहेत – खोकला, ताप आणि चव व वास घेण्याची क्षमता कमी होणे.

स्नायूदुखी हे कोरोनाचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. हे लक्षण ओमिक्रॉन दरम्यान सर्वात सामान्यपणे दिसून आले. रुग्णांना खांदे किंवा पायांमध्ये वेदना जाणवू शकतात. स्नायूदुखी हे देखील कोरोनाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. स्नायूदुखी सौम्य किंवा गंभीर असू शकते. या वेदनांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. हे लक्षण दोन ते तीन दिवस टिकू शकते पण वृद्ध लोकांमध्ये ते जास्त काळ दिसू शकते.

ZOE COVID स्टडी अॅपनुसार, डोकेदुखी हे कोरोना व्हायरसचे कमी ज्ञास असलेले लक्षण असू शकते, परंतु ते ब-याच लोकांमध्ये आढळले आहे. डोकेदुखी सामान्यतः संसर्गाच्या सुरूवातीस उद्भवते आणि सहसा तीन ते पाच दिवस टिकते. कोरोनाची डोकेदुखी मध्यम ते गंभीर अशी असते. ही एक विचित्र प्रकारची वेदना आहे जी भरघाव शस्त्राने वार केल्यासारखी वाटते. पण डोकेदुखी हे लक्षण दीर्घकाळ देखील राहू शकते.

 पण कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे रुग्णांमध्ये काही वेगळी आणि विचित्र लक्षणेही पाहायला मिळत आहेत. पण आता संशोधकांचा असा म्हणणं आहे की वेदना हे देखील कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. जर तुम्हाला डोकेदुखी किंवा स्नायूदुखी जाणवत असेल तर तुम्ही सतर्क राहावे कारण ते कोरोनाचे लक्षण असू शकते. कोरोनामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या भागात वेदना होऊ शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोरोनाची लक्षणे ओळखण्यात आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *