ड्रायव्हरने दोन मुलींसह त्यांच्या आईला संपवले

कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि तिच्या दोन मुलींच्या हत्येनंतर चालकानेही आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या आई आणि तिच्या दोन मुलींचा त्यांच्याच चालकाने आधी धारदार शस्त्राने वार करुन  हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे मृत महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आई मुलगी आणि चालक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चालकाने आधी मुलीच्या आईचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलींचा खून केला नंतर स्वतःच आयुष्य आरोपीने संपवले, अशी माहिती  पोलीस उपायुक्त (जनसंपर्क) संजय लाटकर यांनी दिली.

ही बाब उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या कांदिवली पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी आता पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *