वडिलांनी दुसरं लग्न केलं, मुलाने सावत्र आईला संपवलं

सावत्र आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. 22 वर्षांच्या मुलाने सावत्र आईचा आधी गळ चिरला त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून तिची निर्घृण हत्या केली. पुण्यातल्या भोरमधील धन्वंतरी प्लाझा या इमारतीत ही घटना घडली.

नेमकी घटना काय?
शिवम शिंदे असं आरोपी मुलाचं नाव असून वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा राग त्याच्या मनात होता. वडिला रात्रपाळीला कामावर गेल्याची संध साधत शिवमने पहाटे सावत्र आई रेश्मा अंकुश शिंदे  हिच्या गळ्यावर झोपेत असताना धारधार शस्त्राने वार केले. यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. घरातला दगडी वरंवटा सावत्र आईच्या डोक्यात घातला. हत्या केल्यानंतर शिवम तिथून फरार झाला.

आरोपी शिवम शिंदे हा कामानिमित्त पुण्यातील कात्रज इथं राहत होता. गुन्हा घडला त्या दिवशी तो वडिलांच्या घरी भोर इथं आला होता. आई गेल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा त्याच्या मनात राग होता. हत्या झाली त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिथून पलायन केलं.

मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा वय 18 हिने याबाबत भोर पोलीस स्टेशनंमध्ये फिर्याद दिलीय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *