व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत आकाश दीप संधू (वय ४७, रा. महंमदवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी मोबाइलधारक; तसेच बँक खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश खासगी विमान कंपनीत वैमानिक आहेत. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी संकेतस्थळावर योजनांविषयी माहिती घेतली होती. त्यांना ‘स्टोन इमिको क्लब’ या कंपनीच्या योजनेविषयी माहिती मिळाली. रेडवाइन तयार करण्यासाठी लागणारी सामग्री तयार करण्यात येत असल्याची माहिती चोरट्यांनी दिली. व्यवसायाची साखळी संपूर्ण देशभरात असून, गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. गुंतवणूक योजनेबाबतची बनावट कागदपत्रे पाठविली. त्यानंतर संधू यांनी चोरट्यांच्या बँक खात्यात १६ लाख ६२ हजार रुपये जमा केले. संधू यांना कोणताही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. पोलिस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *