पालघरमधील तारापूर एमआयडीसीत भीषण आग, केमिकल कंपनीत सलग आठ स्फोट

पालघरमधील तारापूर एमआयडीसीत एका कंपनीत रात्री भीषण आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कंपनीत आग लागल्यानंतर आठ मोठे स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या तारापूर एमआयडीसीत आगीच्या घटना वाढत आहेत. आता तारापूर एमआयडीसीतील प्रिमीयर इंटरमीडियरी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याचं बोललं जातंय. अग्निशमन दल आणि स्थानिक पालिका, पोलिसांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.

आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसंच धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही कठीण होत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी असून त्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *