नितिन देशमुख यांचा स्वतःहून सूटका केल्याचा दावा खोटा? खासगी विमानाने अकोल्यात परतले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. परंतू   आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केला आहे.

शिंदे गटातून निसटलेल्या आमदार कैलास पाटील आणि आमदार नितीन देशमुख  यांना आज शिवसेनेने मीडियासमोर आणलं. यावेळी आपल्याला फसवून सूरतला नेण्याच आल्याचा आरोप करत कंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या सुटकेचा थरार मीडियाला सां गितला. परंतू नितिन देशमुख यांचे आरोप खोटे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

आमदार नितीन देशमुखांचा यांनी मी स्वतःची सुटका करून पळून आलो. हा दावा खोटा असल्याचे शिंदे गटाने म्हटलंय. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले त्याचे पुरावे म्हणून फोटो त्यांनी सादर केले. त्यामुळे नक्की खरं कोण बोलतंय असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *