गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात कलाकारांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. आता देखील एका 23 वर्षीय अभिनेत्री गळफास घेत स्वतःचं जीवन संपवल आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर कलाविश्वात एकचं खळबळ माजली आहे. प्रसिद्ध ओरिया टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मिरेखा ओझाचं निधन झालं. भुवनेश्वर येथील भाड्याच्या घरात अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
रश्मिरेखा नयापल्ली परिसरात राहायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 वर्षीय रश्मिरेखाच्या वडिलांनी मुलीचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रावर संशय व्यक्त केला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती संतोषनेच दिल्याचे अभिनेत्रीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
