गत महिन्यात शहरातील सोळापेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव ‘नो फ्लाइंग झोन’ लागू केल्यानंतर आता ‘अग्निपथ’च्या मुद्द्यावरून नाशिक शहर पोलिसांनी अलर्ट दिला आहे. लष्करी केंद्रे, आस्थापनांलगत सैनिकी सुरक्षा वाढविण्यात आली असतानाच पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली आहे. सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या आदेशान्वये लष्करी हद्दीलगत तीनशे मीटर अंतरात संचारबंदीही लागू झाली आहे.
…या भागात संचारबंदी (तीनशे मीटर अंतरात)
-नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पूर्व व पश्चिम बाजू
-आर्टिलरी सेंटरचे अशोकचक्र गेट : खोले मळा, जय भवानीरोड, उपनगर
-आर्टिलरी सेंटरच्या बसंता (भरती गेट)समोरील परिसर
– कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या प्रवेशद्वारासमोर नाशिक-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजू
-स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान : आनंदरोड, देवळाली कॅम्प
-देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस
-छावणी परिषद कार्यालयासमोरील दक्षिण-उत्तर परिसर
-एअर फोर्स स्टेशन देवळाली, साऊथ प्रवेशद्वारासमोरील दक्षिण-उत्तर बाजू
कर्तव्यावरील शासकीय-निमशासकीय कर्मचारी, पोलिस, वैद्यकीय आणि आपत्कालीन सुविधांचे कर्मचारी यांना संचारबंदीत संयुक्तरीत्या शिथिलता असेल. इतरांना महत्त्वपूर्ण कामाची खात्री बंदोबस्तावरील पथकांना करून द्यावी लागेल.
-डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक आयुक्त
