हॉटेल बिल उधारी प्रकरण : राष्ट्रवादीचा हल्ल्याचा कट, सदाभाऊ खोत यांचा थेट आरोप

रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत सांगोला दौऱ्यावर असताना एक हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर त्याने 2014 मधील जेवणाच्या उधारीच्या बिलांची मागणी केली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओबाबत आता सदाभाऊ खोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हॉटेल मालक हा राष्ट्रवादी काँगेसचाच कार्यकर्ता असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय. “दोन दिवस सोलापूरच्या दौच्यावर असताना अनुचित प्रकार घडला. त्यामागे राष्ट्रवादी आहे याचा भांडाफोड मी करत आहे.’

हॉटेल मालक अशोक शिंगारे म्हणत होता की त्याचा राष्ट्रवादी पक्षाशी काही संबध नाही. मात्र राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घघाटनावेळी त्याचा फोटो आहे. जयंत पाटील याच्या पत्रकावरही त्याचा फोटो आहे. 17 एप्रिलला मतदान झाले. 15 एप्रिलला प्रचार संपला. निवडणूक झाल्यानंतर 25 दिवस प्रचाराचा काळ संपला असताना कसा काय जेऊ घालत होता ! राष्ट्रवादीने शिंगारे यांना चुकीचे स्क्रिप्ट दिले. माझ्यावरील हल्ला हा राष्ट्रवादीचा कट होता. टोमॅटोच्या गालाचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा हा प्लॅन होता. यापूर्वीही माझ्यावर राष्ट्रवादीने हल्ले केले आहेत” असा थेट आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

वेळ आली तर न्यायालयात जाणार

हे सरकार सराईत आरोपींना मागे घालत आहे. वेळ पडली तर याप्रकरणात न्यायालयात जाऊ. मी गृहमंत्र्याकडे मागणी करणार आहे की त्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर कुणाचे फोन आले त्याची तपासणी करा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याप्रकरणाबाबत चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय आपण घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत पुढेही असेही म्हणाले की, गेली दोन दिवस राष्ट्रवादीची सोशल मिडियालाल काही प्रश्नच दिसत नाही. कुत्री पिसटल्यासारखी माझा मागे लागली आहेत. पण मी पण मातीतला आहे आलात अंगावर तर शिंगावर घेणार. दिपक साळुंखे याने हा कट रचला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही लुटारूंची टोळी

राष्ट्रवादी हा पक्ष नाही ही लुटारूंची टोळी आहे. सगळे ऊस कररखाने, सूट गिरण्या, महामंडळे सगळीकडे हे लूट करतात. सांगोल्याचा कारखाना बंद पाडून कसा कुणी चालवायला दिला ? लाखो शेतकऱ्यांचे नुकसान यांनी केले. सदाभाऊ मंत्री झाला तर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ दिली नाही. आम्ही फूकटचं खात नाही. गोपीचंद आणि मी आम्ही फकीर आहोत. देवेंद्र यांची कृपा म्हणून आम्ही आमदार, मंत्री झालो असेही खोत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *