कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या महिलेचे अपहरण आणि बलात्कार

पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रॅव्हल्स चालकाकडून स्वारगेट परिसरातून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरणकरून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग (वय 38) असे आरोपीचं नाव आहे.

वाशीम येथून पती,पत्नी काम शोधण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. तेवढ्यात ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग हा रतीकांत बंदीचोडे आणि पीडित महिलेस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार?असे त्यांनी सांगितले. त्या आरोपीवर विश्वास ठेवून दोघे जण बस मध्ये आराम करण्यास गेले.

तेवढ्यात पीडित महिलेचा पती बाथरूम करण्यासाठी गेला असता, आरोपीने काही क्षणात बस तेथून पळवून नेली आणि तू जर आरडा ओरड केल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी दिली.

स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *