ब्रेडच्या किंमतीत पुन्हा वाढ, ब्रेकफास्ट महागला

रविवारी सकाळी ऑम्लेट ब्रेड, स्लाईस ब्रेड वगैरे ब्रेकफास्ट करत असाल तर ही बातमी महत्त्वाची. ब्रेडच्या किंमती महागल्या आहेत. 2 ते 5 रुपयांनी ब्रेडच्या किंमती वाढल्या आहेत.

गेल्या पाच महिन्यात दुसऱ्यांदा ब्रेड महाग झाला आहे. मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्जने आपल्या ब्रेडच्या किंमती वाढवल्या आहेत.

खुल्या बाजारात गव्हाच्या विक्रीवर केंद्राने नियंत्रण न आणल्यामुळे ब्रेडच्या किंमती महागल्या आहेत. 55 रुपयांचा मल्टीग्रेन ब्रेड 60 रुपयांवर गेला आहे. तर ब्राऊन ब्रेड 50 रुपयांवर गेला आहे. डिसेंबर 2021 पासून ब्रेड तब्बल 5 ते  10 रुपयांनी महागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *