मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, वातावरणात गारवा

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत पावसाला सुरूवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस बरसतोय. मुंबईतलं तापमान प्रचंड वाढलं होतं. सर्वसामान्यांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. घामाच्या धारेने वैतगलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या सरीने मुंबईकरांना सुखद अनुभव मिळाला आहे. एकीकडे तळ-कोकणात पाऊस दाखल झाला आहे. तर मुंबईतही मान्सून पूर्व सरी बरसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आज पाऊस झाला आहे. पुणे, नाशिक, धुळे, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस बरसला आहे. त्यानंतर आता मुंबईत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

दरम्यान येत्या 3-4 तासांत मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *