सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मोफक मिळणार स्कूटी

केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, ज्याचा त्यांना थेट फायदा होत आहे. उत्तर प्रदेश सरकारची ‘राणी लक्ष्मीबाई योजना’ आहे, ज्याचा फायदा अनेक तरुणींना लवकरच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. यूपी सरकारची ही योजना काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत गुणवंत तरुणींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला होता.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. तरुणींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

महाविद्यालये, विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *