राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब होत असला तरी पुढच्या ५ दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अशात आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण उद्यापासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *