बेचव चहा दिल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या

चहा थंड व बेचव दिल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. सर्जाद अश्रफ असे या मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे, नवघर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

भाईंदर फाटक येथील औद्योगिक वसाहतीमधील एका चहाच्या टपरीवर सर्जाद अश्रफ हा १५ वर्षीय मुलगा काम करत होता. तो सोमवारी रात्री येथील एका कंपनीमध्ये चहा देण्यासाठी गेला होता. यावेळी सर्जादने आणलेला चहा थंड व बेचव असल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी वाद घातला. हा वाद इतका विकोपास गेला की सर्जादवर सूरजनामक कामगाराने चाकूने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सर्जादला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . ह्या प्रकरणी उपेंद्र चव्हाण नामक इसमाला पोलिसांनी अटक केली आहे .तर मुख्य आरोपी सुरज फरार असून त्याचा शोध घेतल्या जात असल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *