अरुण गोविल यांनी घेतली नवी कार! चाहते म्हणाले पुष्पक विमानाच्या जागी नवी कार…

दूरदर्शन वाहिनीवरील रामायण (Ramayan) ही मालिका सर्वांना माहित आहे. ती मालिका अनेकांनी पाहिली आहे. त्यातील अरुण गोविल (Arun Govil) यांनी साकारलेली प्रभू श्री रामचंद्र (Lord Ram) यांची भूमिका अजरामर आहे. त्यांच्या भूमिका पाहून जनतेनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे.  अरुण गोविल सोशल मीडियावर सक्रिय असतात. अरुण गोविल यांनी नुकतीच एक मर्सिडीज कार (Mercedes car) विकत घेतली आहे. कार खरेदी करतानाचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना त्यांना शुभेच्छा दिल्याच तर काहींनी त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव देखील केला.

‘देवाच्या कृपेनं नव्या वाहनाचे घरी आगमन झालं आहे’

अरुण गोविल (Arun Govil ) यांनी नवीन मर्सिडीज बेंज कार विकत घेतली आहे. कार विकत घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीलेखा गोविल (Shrilekha Govil) यांनी कारचं कव्हर काढलं. 15 सेकंदाचा व्हिडीओ अरुण गोविल यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड करत एक पोस्ट लिहली.  ‘प्रभु कृपा से परिवार में नए वाहन का आगमन हुआ है. आप सब की शुभकामनाएं अपेक्षित हैं.’
त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. तब्बल 48.2 k इतके लाईक या पोस्टला मिळाले आहेत. तर 903 K जणांनी त्यांची ही पोस्ट पाहिली आहे.

‘तुम्ही रथामध्येच चांगले दिसता’अरुण गोविल यांचे फॅन्स भरपूर आहेत. अनेकांच्या मनात गोविल यांची प्रतिमा प्रभू श्री रामचंद्रांची आहे. गोविल यांच्या पोस्टवर त्यांचे एक चाहते डॉ, प्रेम शंकर यांनी थेट त्यांच्याकडे जुन्या गाडीची मागणी करुन टाकली.
एक युजर उज्जल त्रिवेदी यांनी लिहलंय, ‘जय श्रीराम, तुम्ही रथामध्येच चांगले दिसता, पण कलियुग आहे सगळं चालतं’त्यांच्या एका चाहता, उज्ज्वल त्रिपाठी यांनी ट्विट केले की, ‘अरे भगवान, तुम्ही पुष्पक विमानाच्या जागी कोणत्या प्रकारचे ‘मेड इन जर्मनी’ वाहन घेतले?
थोडक्यात काय तर रामयण मालिकेच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा चाहते अरुण गोविल यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *