पती डेनियल वेबर याच्या परवानगीनेच सर्व कामे करते. माझ्या प्रसिद्धीमागे पतीचा मोठा वाटा आहे, असे पॉर्नस्टार व अभिनेत्री सनी लिऑन हिने म्हटले आहे.
सनी लिऑन व डेनियल वेबर यांचा सन 2009 मध्ये विवाह झाला आहे. ती म्हणाली, ‘डेनियल हा केवळ पती नसून व्यावसायिक भागीदार देखील आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटाचे कथानक डेनियलच मंजूर करतो. त्याच्या परवानगीनेच सर्व कामे करते. इंटरनेटवर माझी छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड होतात. ही सर्व डेनियलने पाहिल्यानंतरच अपलोड होतात. त्याच्या परवानगीशिवाय एकही छायाचित्र अपलोड केले जात नाही. डेनियल हा लॉस एंजलिसचा रहिवासी आहे. मात्र, आता तो माझा व्यावसायिक व्यवस्थापक झाला आहे.‘
डेनियल म्हणाला, ‘भारतीय नागरिक पॉर्न चित्रपटांकडे चुकीच्या दृष्टीने पाहतात. परंतु, आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. सनीला स्वयंपाक करता येत नाही. पण, मी स्वतः चांगले पदार्थ तयार करतो.‘
