गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. केके यांना मंगळवारी रात्री कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्म करताना अचानक तब्बेत बिघडली त्यानंतर त्यांना १०.३० वाजता त्यांना तात्काळ सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ११.३० च्या सुमारास केके यांच्या निधनाची बातमी समोर आली.
केके यांच्या निधनाने चाहत्यांपासून अगदी बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का बसला आहे. एका गायकाने लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूला कवटाळणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे. केके यांनी लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूच्या काही वेळा पूर्वी ‘हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल…’ हे गाणं गायलं होतं. यानंतर असं काही होईल याचा कुणी विचारही केला नव्हता. हृदयविकाराचा झटका येण्यामागे काय कारण असू शकतात याबाबत झेन रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ सल्लागार डॉ. नारायण गडकर यांनी माहिती दिली.
नेमकं कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
केके यांनी कोलकाताच्या विवेकानंद कॉलेजमध्ये जवळपास दोन तास परफॉर्म केलं. या कार्यक्रमादरम्यान केके यांना प्रचंड घाम येत होता. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान असं होऊ शकतं. मात्र कार्यक्रमानंतर केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ हॉटेलमध्ये नेलं.
कार्यक्रमानंतर केके हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना उल्टी झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांनतर त्यांना लगेच मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट नेण्यात आलं. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. केके यांना मंगळवारी रात्री कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्म करताना अचानक तब्बेत बिघडली त्यानंतर त्यांना १०.३० वाजता त्यांना तात्काळ सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ११.३० च्या सुमारास केके यांच्या निधनाची बातमी समोर आली.
केके यांच्या निधनाने चाहत्यांपासून अगदी बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का बसला आहे. एका गायकाने लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूला कवटाळणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे. केके यांनी लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूच्या काही वेळा पूर्वी ‘हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल…’ हे गाणं गायलं होतं. यानंतर असं काही होईल याचा कुणी विचारही केला नव्हता. हृदयविकाराचा झटका येण्यामागे काय कारण असू शकतात याबाबत झेन रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ सल्लागार डॉ. नारायण गडकर यांनी माहिती दिली.
केके यांनी कोलकाताच्या विवेकानंद कॉलेजमध्ये जवळपास दोन तास परफॉर्म केलं. या कार्यक्रमादरम्यान केके यांना प्रचंड घाम येत होता. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान असं होऊ शकतं. मात्र कार्यक्रमानंतर केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ हॉटेलमध्ये नेलं.
कार्यक्रमानंतर केके हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना उल्टी झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांनतर त्यांना लगेच मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट नेण्यात आलं. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.