लग्नाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, चौघांनी जागीच गमावला जीव

लग्न समारंभ म्हणजे आयुष्यातील आनंदाच्या क्षण. पण या आनंदाच्या क्षणावर विरझण नियतीनं घातलं. काळ आणि वेळ एकत्रच आले आणि मृत्यूनं कुटुंबाला रस्त्यातच गाठलं.

बेळगावहून निपाणीच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने कारला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दहाच्या सुमारास ताईच्या लग्नाला येणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाला.

या अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये असलेल्या मुलीचा भाऊ, काक, काकू आणि आजी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

 मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली, हे सर्वजण निपाणी तालुक्यातील बोरगाव वाडी गावचे रहिवासी आहेत. महेश देवगोंडा पाटील, अदगोंडा बाबगौडा पाटील, छाया अदगोंडा पाटील आणि चंपाताई मगदुम अशी मृतांची नावं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *