समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे एका भरधाव ट्रकने चारचाकीला चिरडल्यामुळे एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील एकाच कुंटुंबातील तिघांचा, कार चालक आणि ट्रकमधील दोघांचा समावेश होता. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी मध्यरात्री एक इथनॉलने भरलेला ट्रक मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पलटला त्यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. काही क्षणातचं मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या धडकेत गाडीती चौघांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी तीन प्रवासी एकाच कुटुंबातील होते व चौघंही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होते. यासह ट्रकमधील दोघांचाही जागीच अंत झाला.
ट्रकमधील दोघांचाही मृत्यू
दरम्यान, मिरच्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये ट्रकचालक व अजून एक सहप्रवासी होता. धडकेमुळे ट्रकला आग लागली. या दोघांचाही या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाचं नाव संजय कुमार असून तो उत्तर प्रदेशात धनाजीपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. दुसरा प्रवासी क्लीनर असून त्याचं नाव समरजित पाल असं होतं व तो उत्तर प्रदेश राज्यात गडहरियनपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मुलीच्या आयुष्यातील इतका मोठा टप्पा गाठून तिला शुभेच्छा देऊन पुन्हा घरी निघाले असताना काळाने झडप घेतली. मुलगीही आपलं शिक्षण आणि पुण्यात आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी उत्साही होती. परंतु, तिच्या उत्साहाचं अवघ्या काही तासांमध्ये दुःखात रुपांतर झालं.
महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे एक-दोन नव्हे तर चारही कुंटुंब उध्वस्त झाली आहेत. असे अपघात रोखण्यासाठी कशी सावधगिरी बाळगली पाहिजे.
