कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा मजूमदारने गळफास घेत जीवन संपवलं आहे. बुधवारी बिदिशाचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. उभरती मॉडेल आणि अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातमीने
बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. बिदिशा नगर मार्केटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची आणि तिथेच तिने आत्महत्या केली.
बुधवारी संध्याकाळी पोलिसांना अभिनेत्रीचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पोलिसांनी मिळाली सुसाईड नोट…
रिपोर्टनुसार, बिदिशा 4 महिन्यांपूर्वीच नागर बाजारमध्ये राहू लागली होती. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिदिशाच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे.
