काम करुनही एक पैसा न दिल्याने संतप्त कामगाराने मालकालाच मारहाण करण्याची घटना घडली. वर्षभरापासून थकलेला पगार न दिल्याने दोन कर्मचाऱ्यांनी दुकानातून गोंधळ घातला आणि दुकान मालकाला मारहाण केली. कल्याणात घडलेल्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात संतोष गुप्ता यांचे विघ्नहर्ता नावाने स्टील खरेदी विक्रीचा दुकान आहे . वर्षभरापूर्वी त्यांच्याकडे हुसेन आणि परवेश हे दोघे काम करत होते. वर्षभरापासून पगाराचा हिशोब न दिल्याने या दोघांनी गुप्ता यांना वारंवार विचारणा केली. गुप्ता यांनी दोघांना बोलवून हिशोब देतो, असं सांगितले. मात्र त्याच दिवशी या तिघांमध्ये वाद झाला.
या वादात कर्मचाऱ्यांनी दुकानात गोंधळ केला. यावेळी कामगारांनी गुप्ता यांनादेखील मारहाण केली . ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांनी दिली.
देशाच्या विविध भागातही सध्या जोरदार पाऊस पडत असून, पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीमसह पश्चिम बंगालमध्ये पुढील तीनचार दिवस पाऊस होणार आहे. उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत, तर दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पुढील तीनचार दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मोसमी पावसाची स्थिती
र्नैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी (१८ मे) बंगालच्या उपसागरात पूर्वोत्तर दिशेने काही भागात प्रगती केली होती. त्यामुळे या भागासह अंदमान-निकोबार बेटांवर सध्या मोसमी पाऊस होतो आहे. गुरुवारी (१९ मे) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. १६ मे रोजी मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाल्यापासून बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील भागात त्याची प्रगती झालेली नाही. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत ते दक्षिण अरबी समुद्रात दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पाऊसभान.. राज्यात पुढील एक ते दोन
दिवस पावसाची शक्यता कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागांत पावसाची शक्यता आहे. कोकणात काही भागांत मुसळधारांची शक्यता असून, किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
