धक्कादायक : प्रसिद्ध चेहरा हरपला; अभिनेत्रीनं गळफास घेत संपवलं आयुष्य

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अभिनेत्रींच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतंच कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा सर्जरी दरम्यान मृत्यू झाला. आता आणखी एका दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी ट्रान्सवुमन मॉडेल तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे.

एक्ट्रेसला वाचवू नाही शकले पोलिस 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्याळी अभिनेत्री शेरीन सेलिन मॅथ्यू तिच्या मैत्रिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. 26 वर्षीय अभिनेत्री ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅट करत होती त्या व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्यांना शेरीनच्या हालचालीची माहिती दिली. मात्र पोलिस अधिकाऱ्यांना अभिनेत्रीला वाचवता आलं नाही. कारण ते घरी पोहोचेपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.

डिप्रेशनशी झुरत होती शेरीन
शेरीन सेलिन मॅथ्यूच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अभिनेत्रीच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली आहे की, अभिनेत्री डिप्रेशनची शिकार होती. गेल्या काही दिवसांपासून ती खूप उदास वाटत होती. या घटनेसंदर्भात पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत आहेत. तपास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात येणार आहे. शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि मॉडेलिंगच्या जगात ती खूप सक्रिय होती. कोचीमध्ये गेल्या वर्षभरात ट्रान्सजेंडरने केलेल्या आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *