प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! 9 बायकांमध्ये मुलासाठी शर्यत, नवऱ्याला आता हवंय मुल

एका पुरुषाला नऊ बायका असून, अनेक महिन्यांपासून तो या सर्वांसोबत राहत आहे. आता त्याला बाळ हवे आहे. त्यासाठी त्यांनी एक दिनचर्या बनवली आहे. हा दिनक्रम  ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व’  या तत्त्वावर असणार आहे.

मूळचा ब्राझीलचा असलेला आर्थर ओ उर्सोने, अलीकडेच ‘पत्नींशी संबध ठेवण्यासाठी रोस्टर’ तयार केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. परंतू हे रोस्टर बनवल्याने त्यालाच अडचणी आणि तणावाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याने हे रोस्टर रद्द करून नवीन रोस्टर तायर केले.

आर्थरला त्याचे पहिले अपत्य कोणत्या पत्नीकडून हवंय हे अद्याप निश्चित करता आलेले नाही. तो म्हणाला की, कोणत्या पत्नीपासून अपत्य होईल याबाबत मला काही फरक पडत नाही. परंतू त्या बाळाचा सांभाळ आम्ही सगळे मिळून करू.

आर्थरने म्हटले की, माझे कोणत्याही पत्नीसाठी विशेष प्राधान्य नाही. की तिला मी अपत्यासाठी प्राधान्य देईल. जे काही होईल ते नैसर्गिक व्हावं असं मला वाटतं.

जेव्हा आर्थरने आपल्या बायकांना अपत्याबाबत सांगितले तेव्हा त्यातील काही उत्सुक नव्हत्या. तर काहींना खूपच उत्सुकता होती.

आर्थर म्हणाले- मला विश्वास आहे की जेव्हा घरात पहिले मूल येईल तेव्हा सर्वांना आनंदी वातावरण अनुभवता येईल. त्यानंतर इतर पत्नींनाही अपत्य प्राप्तीचा आनंद घ्यावासा वाटेल. परंतू सध्या फर्स्ट कम, फर्स्ट सर्व हेच धोरण असणार आहे.

इंस्टाग्रामवर आर्थरला 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. जिथे तो नियमितपणे पत्नीसोबत फोटो टाकत असतो. कधी तो त्यांच्यासोबत रोमान्स करताना दिसतो तर कधी त्यांच्यासोबत आउटिंग करताना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *