धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुपीठ संचालकांविरुद्ध निधीच्या अपहाराची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
निविदा न काढता कामांवर खर्च केल्याचा ठपका संचालकावंर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुरुपीठाच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंर पुढील योग्य की कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
