बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आणखी एक अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. पूजाने आजवर बॉलिवूडमधील बऱ्याच टॉपच्या कलाकारांबरोबर काम केलं. रुपेरी पडद्यावर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडल्या. आताही तिच्या हाती बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. चित्रपटांमुळे चर्चेत असणाऱ्या पूजाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने सलमान खानचं ब्रेसलेट घातलं आहे.
पूजाने सलमानचं ब्रेसलेट घालत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण तिने हे ब्रेसलेट का घातलं याचं कारण देखील फोटो शेअर करत सांगितलं आहे. सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्ये पूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. म्हणूनच तिने सलमानचं ब्रेसलेट घालत चित्रीकरणाला सुरुवात असं म्हटलं आहे. पूजासाठी सलमानबरोबर काम करणं म्हणजे एक सुवर्णसंधी आहे.
