पॅरॅलिसिस कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने बोलावलं कामावर, पण त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला.

अमरावती  शहरालगत असलेल्या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये  कार्यरत कर्मचारी विजय अडोकर  यांना पॅरॅलिसिसचा आजार होता. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून ते रजेवर होते. या आजारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी कामावर बोलावलं.

विजय अडोकार हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत होते. त्यांना पॅरॅलिसिसचा ( Paralysis ) आजार होता. त्यामुळे त्यांनी दोन महिने सुट्टी टाकली होती. परंतु, कामावर रुजू होण्यासाठी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी नोटीस पाठविली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या जाचाला कंटाळून आज सकाळी विजय अडोकर यांनी आपल्या घराजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या वडिलांनी बदलीसाठी वारंवार अर्ज केला होता. मात्र, अर्ज करूनही त्यांची बदली केली नाही. तसेच, पोलीस आयुक्त आरती सिंग  यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप त्यांची मुलगी अंकिता हिने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *