चालकाला झोप लागली अन् घात झाला; यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात पुण्यातील चार जणांचा मृत्यू

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात मृत पावलेल्यांपैकी चार जण पुण्याचे रहिवासी आहेत, तर एक कर्नाटकचा आहे. मृतांमध्ये चार महिला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाने ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पहाटे ५ वाजता जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं तर दोघांवर कैलाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांमधील चार प्रवासी महाराष्ट्रातील असून ६० वर्षाच्या वयोगटातील आहेत. चालकाची झोप लागल्याने हा अपघात झाला असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सध्या ट्रक जप्त केला आहे

याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. नातेवाईक पोहोचल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जातील. गेल्या आठवड्यात यमुना एक्स्पेसवेवर मथुराजवळ मागून येणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर सात जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *