कुर्ला परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कुर्ला पश्चिम परिसरातील साकीनाका येथील एक्स्प्रेस इन हॉटेलच्या समोर १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर झडपा बसविण्याचे काम १० मे रोजी सकाळी १० ते ११ मे रोजी सकाळी १० या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात पालिकेच्या एल विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुर्ला परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.कुर्ला परिसरातील जरीमरी, शांतीनगर, तानाजीनगर, श्रीकृष्णानगर, सत्यानगर पाइपलाइन मार्ग, वृन्दावन खाडी नंबर ३, आशा कृष्णा इमारत, अन्नासागर इमारत, तिलकनगर, साईबाबा कंपाऊंड, डीसिल्वा बाग, एल. बी. एस. नगर, शेठीयानगर, सोनानीनगर, महात्मा फुलेनगर, बरेली मस्जिद परिसर, शिवाजीनगर, अंधेरी कुर्ला मार्ग, अनिस कंपाऊंड, अंबिकानगर, सफेद पूल, उदयनगर येथे सकाळी ६ ते दुपारी १ ही नियमित पाणीपुरवठय़ाची वेळ आहे. मात्र कामादरम्यान १० मे २०२२ रोजी पाणीपुरवठा सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेत होईल आणि सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. ११ मे २०२२ रोजी सकाळी १० पर्यंत पाणीपुरवठा होणार नाही आणि सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. कुर्ला दक्षिण भागातील काजूपाडा, बैल बाजार, नवपाडा, एल. बी. एस. मार्ग, सुंदरबाग, ख्रिश्चन गांव, न्यू मिल मार्ग, हलाव पूल, मसरानी गल्ली, ब्राह्मणवाडी इत्यादी ठिकाणी सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.४५ ही पाणीपुरवठय़ाची वेळ आहे. मात्र कामादरम्यान १० मे  आणि ११ मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *