राणा दाम्पत्य दिल्लीत जाणार, ठाकरे सरकारविरोधात तक्रार करणार?

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा नवनीत राणा शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकताना दिसत आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा आज दिल्लीमध्ये जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीत जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरे सरकार विरोधात आणि जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची राणा दाम्पत्य तक्रार करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचीही राणा दाम्पत्य भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा शाधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का? अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *