13 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची रुग्णालयात भेट, नवनीत राणा यांना अश्रु अनावर

ब्बल 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची आज तुरुंगातून सुटका झाली. १३ दिवसांनंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana( भायखळा जेलबाहेर आल्या.  त्यांची तब्येत बिघडल्यानं जेलमधून त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

तर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची तळोजा जेलमधून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर हनुमान चालिसा वाचत जेलबाहेर पडले

दरम्यान, तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर आमदार रवी राणा यांनी थेट लीलावती रुग्णालय गाठत खासदार नवनीत राणा यांची भेट घेतली. रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांना अश्रु अनावर झाले.

नवनीत राणा रुग्णालयात
खासदार नवनीन राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय होणार आहे.

13 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर
खासदार नवनीत राणा आणि आमदार रावी राणा यांची तब्बल 13 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला त्यानंतर आज त्यांची सुटका झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *