सेल्फीच्या नादात ओढवला मृत्यू

टेक्‍सासमधील एका युवकाने मोबाईलवरून सेल्फी घेण्याच्या नादात स्वत:ला गोळी मारून घेतली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या युवकाने पिस्तुल घेऊन ती स्वत:च्या गळ्याला लावली आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.

सेल्फी काढताना त्याने बंदूक धरली तेव्हा बंदुकीमध्ये गोळ्या आहेत, हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे सेल्फी घेताना गंमत म्हणून त्याने खटका दाबला आणि गोळी त्याच्या गळ्यातून आरपार गेली. रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *