सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर नैराश्याचा मजकूर पाठवून वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात विद्यार्थी शिकत होता. शहरातील वेलकम भागात तो कुटुंबीयांसोबत राहत होता. आई कामानिमित्त दुबईत गेली आहे. वडिलांचा फोटो स्टुडिओ आहे. व्हॉट्सऍपवर त्याने नैराश्याचा मजकूर पाठवून वाढदिवसापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली.‘
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. विद्यार्थ्याचा मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. याबाबत पुढील शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
