रामदास कदम यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, म्हणाले शिवसेना…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. मात्र, या भेटीत काय चर्चा झाली, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या भेटीची उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज आहेत. त्यानंतर त्यांनी प्रथमच शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला भेटले.

जिवंत असेपर्यंत शिवसेनेची, भगव्याची साथ सोडणार नाही अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे. त्यांनी आज संजय राऊतांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, जीवंत असेपर्यंत भगव्याची साथ मी कदापि सोडणार नाही, हे मी आधीच सांगितले आहे. पक्षाशी बेईमानी करणार नाही. मी स्वत:ला असा डाग कधी लावणार नाही. भगव्याचा झेंडा माझ्या खांद्यावर असणार मरेपर्यंत  असणार आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.

खेडमधील जागर कदम वंशाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी ते राऊत यांच्या भांडुपमधील घरी आले होते. त्यावेळी त्यांनी कितीही अफवा उठवल्या, बदनाम केलं तरी भगव्याची साथ सोडणार नसल्याचं म्हटले आहे. शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेनेची साथ सोडणार आहे, असे कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *