वरमालानंतर नववधूच्या आईसोबत असे काही घडले, की सर्वांनाच बसला धक्का

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नादरम्यान असं काही घडलं की, ज्या घरातून डोली निघणार होती, त्या घरातून अर्थी उचलली गेली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती.

नक्की काय घडलं

ही धक्कादायक घटना मथुरेच्या नौझील येथील मुबारिकपूर गावात घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लग्नादरम्यान ही घटना कोणी घडवली याचा शोध घेतला जात आहे.

जयमालानंतर नववधू आपल्या खोलीत परतली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. वधूने पाहिले की तिच्या आईला कोणीतरी गोळी मारली आहे.

असा काहीसा प्रकार त्या दिवशी घडला

वधूच्या वडिलांनी सांगितले की, जयमाला नंतर त्यांची मुलगी तिच्या खोलीत गेली तेव्हा तिला आईचा मृत्यू झाल्याचे दिसले. माझ्या बायकोवर कुणीतरी गोळी झाडली होती.

याप्रकरणी मथुरा (ग्रामीण) एसपी शिरीष चंद्र म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली जात आहे.

वधूच्या आईच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्या घरात मुलीच्या लग्नाचा सनई गुंजत होता, तिथे आज शोककळा पसरली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *