मातोश्रीसह वर्षा, सिल्व्हर ओक आणि VIP व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट

आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांच्या आंदोलन इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसह वर्षा, राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्तान सिल्व्हर ओक तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घ्यायच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेनेची फिल्डिंग लावली होती. मात्र, राणा दाम्पत्यांने गनिमी कावा करत मुंबईत दाखल झाले. अमरावतीत रोखण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला होता. मात्र, पहाटेच विमानाने राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. दरम्यान, मुंबईत आल्यास त्यांना प्रखर विरोध करणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर रेल्वेने राणा येणार यांची माहिती मिळताच सीएसएमटी स्टेशनवर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. राणा दाम्पत्यांनं मुंबई येऊन दाखवावं, शिवसैनिकांचं आव्हान दिले होते. मात्र, राणा दाम्पत्य सकाळी मुंबईत विमानाने दाखल झाले. त्यामुळे आता शिवसेनेच्या विरोधानंतर हनुमान चालीसा आंदोलन करणार का, याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *