बापाकडून पोटच्या मुलीचा 1 लाखात सौदा

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आला आहे. पोटच्या मुलीचाच बापाने सौदा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दोन महिन्यांच्या चिमुरडीची विक्री करून बापाने बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी पित्यासह विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. 1 लाखात मुलीला विकले. त्यानंतर हा निर्दयी बाप एवढ्यावर राहिला नाही तर त्याने मुलीला विकल्याची वाच्छता केल्यास पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर चिमुकलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. आरोपीनं मिळालेल्या पैशात बाईक, म्युझिक सिस्टिम आणि दिवाण अशा ऐशोआरामच्या वस्तू खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *