धनंजय मुंडे यांना खंडणीची धमकी, खंडणी न दिल्यास…

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेनं बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आलीय. ही महिला धनंजय मुंडे यांच्या परिचयाची आहे. याबाबत मुंडे यांनी तक्रार दाखल केलीय.

फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सदर महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. हे न दिल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती.

मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेला वर्ग करून तपासाला देण्यात आलंय. बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन या महिलेने 5 कोटींची मागणी केली असं या तक्रारीत म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *