प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामाराव यांचं निधन

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९५० च्या अखेरीस त्यांनी आपले चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली. १९६६ ते २००० या काळात टी रामाराव यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

टी रामा राव हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून टी रामा राव यांच्या निधनानंतर एक ट्वीट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *