राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा; ५ जूनला अयोध्येला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतली. हनुमान चालिसा पठणावरुन आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून सध्या जोरदार टीका होत आहे. त्यानंतर आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *