अल्पवयीन प्रेयसीला लॉजवर नेलं आणि प्रियकराने… वसईतल्या घटनेने खळबळ

वसईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियसीची हत्या करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना वसईल्या कळंब गावात उघडकीस आली आहे.

वसईच्या कळंब गावातील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केली. वसईच्या कळंब इथल्या हार्दिक या लॉज मध्ये हा प्रकार घडला आहे. हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकरानेही ट्रेनखाली आत्महत्या केली आहे. अभिषेक शहा ( वय 21) असं या तरुणाचं  नाव आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास तरुण तरुणी हार्दिक लॉज मध्ये आले होते. त्यानंतर काही वेळाने तरुण जेवण आणण्यासाठी बाहेर गेला मात्र परतलाच नाही. त्यामुळे लॉज चालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा तरुणी मृतावस्थेत पडली होती. लॉज मालकाने याची माहिती पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *