ठाण्यात 12 एप्रिलला ‘राज’गर्जना, मनसेकडून जय्यत तयारी

राज ठाकरे यांच्या 12 तारखेच्या ठाण्यातील सभेचा ट्रेलर मनसेनं रिलीज केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) उत्तर देणार आहेत. या सभेचं नावच उत्तर सभा असं ठेवण्यात आलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 12 एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा होत आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर आता राज ठाकरे काय बोलणार याची उत्सूकता अनेकांना  लागली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या संभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. तसेच मदरशांमधले गैरप्रकाराबाबत वक्तव्य केले होते. यानंतर महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

भाजप-मनसे युतीची चर्चा, हिंदुत्ववादी भूमिका, कार्यकर्त्यांची नाराजी अशा विषयावर राज ठाकरे हे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.

राज ठाकरे यांची भूमिका आता हिंदुत्वाच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता 12 तारखेला होत असलेल्या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *