युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय.
कोरोनाच्या कापा आणि XE या नव्या घातक व्हेरियंटनं मुंबईत प्रवेश केल्याचं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं. त्यामुळं मुंबईकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानं XE व्हेरियंट सापडल्याचा मुंबई महापालिकेचा दावा फेटाळलाय.
रम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही घाबरण्याचं कारण नसल्याचं म्हटलंय. असं असलं तरी सावध राहणं आवश्यक आहे. कारण XE व्हेरियंटची लक्षणं ही आधीच्या कोरोनापेक्षा काहीशी वेगळी आहेत.
काय आहेत XE कोरोनाची लक्षणं?
XEची लागण झाल्यास नाक वाहणं, शिंका येणं, घशात खवखव अशी लक्षणं दिसतात. मूळ व्हायरसमधील ताप, खोकला ही लक्षणं XEमध्ये आढळत नाहीत. चव न लागणं, वास न येणं ही पूर्वीची लक्षणं XE व्हेरियंटमध्येही दिसून येतायत.
