राज्य शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत प्राणी-पक्षी यांच्या देखभालीसाठी ; मेहबूबचाचा यांचा अनोखा निर्णय

करोनामुळे पत्नी मेहरुन्नीसाचे निधन झाल्यानंतर राज्य शासनाकडून मिळालेली पन्नास हजार रुपयांची मदत प्राणी-पक्षी यांच्या देखभालीसाठी खर्च करण्याचा निर्णय येथील प्राणी-पक्षिप्रेमी मेहबूबचाचा यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मेहबूबचाचांनी २४ हजार रुपयांच्या मातीच्या पसरट छोटय़ा कुंडय़ा विकत घेतल्या असून या पसरट कुंडय़ांमध्ये पाणी घालून त्या दोरीने झाडांवर बांधता येऊ शकतात. यात पाणी घालून ठेवले तर सध्याच्या ऐन उन्हाळय़ात पक्ष्यांना हे पाणी पिता येऊन त्यांची तहान भागू शकेल, असा उद्देश या मागे आहे. या कुंडय़ाचे ते मोफत वाटप करत आहेत.  तसेच त्यांनी दहा हजार रुपये किमतीची झाडांचे संरक्षण करणारी साधनसामग्री विकत घेतली. मोठी झाडे लावून त्याभोवती याचे संरक्षक कवच उभे केले आहे.  तर १६ हजार रुपयांची रक्कम जखमी पक्षी, प्राणी यांच्यावर वैद्यकीय उपचारांसाठी राखून ठेवली आहे. जखमी पक्षी बरे झाल्यानंतर त्या पक्ष्यांना ते पुन्हा मोकळय़ा हवेत सोडून देतात. घरखर्च आणि उदरनिर्वाहासाठी ते टेम्पोचालक म्हणून काम करतात.

वसईतील वर्तक अभियांत्रिकी महाविद्यालयातील शाखेसह मॅकेनिकल, आय टी, संगणक विभागातील 40 मुलांनी ही कार बनवली आहे. त्यांनी शैक्षणिक प्रकल्प म्हणून 2017पासून ही कार बनविण्यास सुरुवात केली होती. तीन चाके असलेली ही कार असून तासी 65 किमी वेगाने धावू शकते. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यावर किमान 125 किमी प्रवास करता येणार आहे.

सध्या ही कार रस्त्यावर आली नसली तरी भविष्यातील इंधन पर्याय म्हणून याकडे पहिले जात आहे.ही कार पूर्णतः विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात बनवली आहे. यासाठी 3 वर्षे लागले असून 4 लाख रुपये इतका खर्च आला आहे, अशी माहिती विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक चौधरी आणि कार तयार करणाऱ्या सदस्य मनीषा बुसवा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *