संजय राऊतांची पुन्हा शिवराळ भाषा; किरीट सोमय्यांवर विक्रांत निधीत घोटाळ्याचा आरोप

युद्धनौका INS विक्रांत डिकमिशन केल्यानंतर, ती भंगारात जाणार होती. ती भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्या आणि सहकाऱ्यांनी 58 कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. 200 कोटी रुपये राजभवनात पैसे गोळा करू असे सांगितले गेल. परंतू असे कोणतेही पैसे राजभवनात जमा झाले नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांंनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.

संजय राऊत यांचा गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत चळवळ’ केली त्यातून पैसे गोळा केले.  २०० कोटी रूपये राज भवनात जमा करू असं सोमय्या यांनी सांगितले होते. 2013 – 2015 मध्ये विक्रांत नौकेसाठी पैसे जमा केले आहेत. का असे माहिती अधिकारात विचारले गेले होते. त्यावर राज्यपालांचे उत्तर आहे. की अशी कोणतीही पैसे जमा केले नाहीत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सोमय्यांनी देशद्रोह केलाय. १०० कोटी वर घोटाळा केला. राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते कसं कारवाई करणार? सीबीआय ईडीला हा गुन्हा मोठा वाटत नाही का? असा सवालही राऊत यांनी विचारला.

आयएनएस विक्रांतचे पैसे सोमय्यांनी त्यांच्या मुलाच्या कंपनीत वापरले आणि निवडणूकीसाठी वापरले. आयएनएस विक्रांत फाईल पेक्षा हे भयंकर आहे. हा गुन्हा कसाब पेक्षा भयंकर आहे.

अशा प्रकारच्या देशद्रोह्यांना सुरक्षा दिली जातेय. माझे आवाहन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह राजनाथ सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांनी कश्मीर फाईल पाहून झाली असेल तर विक्रांत फाईल पाहा, तुमचा आत्मा जिवंत असेल तर भ्रष्ट सोमय्यावर कारवाई करा? असेही त्यांनी म्हटले आहे

संजय राऊतांकडून किरीट सोमय्या यांना शिवीगाळ

भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत युद्धनौकेच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला. परंतू यावेळी राऊतांनी सोमय्या यांना तुफान शिवीगाळ केली. राऊत यांनी आरोप करतेवेळी पुन्हा शिवराळ भाषेचा वापर केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *