शेकडो पायऱ्या चढून राज ठाकरे सप्तश्रुंगीच्या दर्शनाला

शेकडो पायऱ्या चढून राज ठाकरे सप्तश्रुंगीच्या दर्शनाला

नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सप्तश्रुंगी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेतलं. साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणीच्या या देवी मंदिरात, राज यांनी त्यांच्या पत्नी शर्मिला यांच्यासह हजेरी लावली.

नाशिकातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राज सकाळी साडेदहाच्या सुमारास सप्तश्रुंग गडावर पोहचले. गडावरून मंदिरापर्यंत असलेल्या पाळण्याचा वापर न करता आपल्या पत्नीसह शेकडो पायऱ्या चढून त्यांनी देवीचं दर्शन घेऊन पूजा आणि आरती केली.

सुमारे एक तास राज सप्तश्रुंग देवीच्या मंदिरात होते. त्यानंतर थेट साधूग्राम गाठत तेथे त्यांनी विविध संत महंतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना नाशिकमध्ये मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *