टायगर मेमनच्या नावाने धमकी देणाऱ्या इसमाला कराची पोलिसांनी अटक केली आहे, मात्र आपण टायगर मेमन नसल्याची कबुली त्याने पोलिसांनी बदडल्यानंतर दिली आहे. मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमनला पाकिस्तानात अटक करण्यात आल्याची बातमी, जिओ टीव्ही न्यूजने दिली होती.
टायगर मेमन हे नाव वापरून एका माणसाने एकाला फेसबुकवरून धमकी दिली होती. त्याला कराची पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आपण टायगर मेमन नसून फेसबुकवर तसं फेक अकाऊंट बनवल्याची कबुली त्याने दिली आहे.
पाकिस्तानातील न्यूज चॅनेल जिओ न्यूजने ही बातमी प्रसारीत केली होती, पकडण्यात आलेला माणूस हा टायगर मेमन नसल्याचं सांगण्यात येत आहे.
