एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा ग्रामिण भागातील विद्यर्थ्यांंना चांगलाच फटका बसला आहे. बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांंचे हाल होत असून, दररोज पायपीट करण्याची वेळ विद्यार्थ्यांंवर आली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांंची मोठी गैरसोय झाल्याचे या निमित्ताने aपाहायला मिळत आहे. एस टी कर्मचारी अद्यापही तोडगा निघालेला नाही. संपामुळे जनसामान्यांचे मात्र हाल सुरुच आहेत. त्यांना महागडय़ा खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो आहे. अलिबाग आगारातील १३२ कर्मचारी अद्यपही संपावर आहेत. त्यामुळे ३४ जण कामावर रुजू झालेले असले, तरी त्यातील बहुतांश जण हे प्रशासकीय आणि अभियांत्रिकी विभागातील आहे. त्यामुळे १० चालक वाहकांच्या मदतीने बससेवा सध्या चालविण्यात येत आहे. आगारातून ९ गाडय़ांच्या ५४ फेऱ्या दरदिवसाला होत आहेत. यात प्रामुख्याने अलिबाग पनवेल मार्गावरील गाडय़ांचा समावेश आहे.
इतर मार्गावरील एसटी बस सेवा तसेच ग्रामिण भागातील मार्गावर चालणारी एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील नागरीकांचे हाल सुरुच आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांंना बस सेवा बंद असल्याने दररोज पायपीट करावी लागत आहेत. परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातील बस सेवा सुरु करा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
अलिबाग आगारातील केवळ १० चालक वाहक कामावर रुजू झाले आहेत. त्यांच्या मदतीने दररोज ५४ बस फेऱ्या आम्ही चालवत आहोत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ग्रामिण भागातील बससेवा अद्यप सुरु करता आलेली नाही. कर्मचारी कामावर हजर झाले तर इतर मार्गांवरील बस सेवा सुरु करता येईल.
ग्रामिण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांंसाठी एस टी ची बससेवा हा किफायतशीर पर्याय असतो. पण गेल्या अनेक दिवसांपासून ही बससेवा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंची मोठी गैरसोय होत आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दुहेरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे
