जयपूरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा, २७ ताब्यात

जयपूरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा, २७ ताब्यात

राजस्थानची राजधानी जयपूरजवळ पोलिसांनी एक रेव्ह पार्टी उध्वस्त केली. छापा टाकून पोलिसांनी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २७ जणांमध्ये एका परदेशी युवतीचा समावेश आहे. पहाटे ४ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.

शहरापासून २५ किलोमीटरवर नृत्यांगना गुलाबोच्या फार्म हाऊसमध्ये शेतात रेव्ह पार्टी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही सूचना गांभिर्याने घेतली त्यानुसार सापळा रचला. पोलिसांना शेतात जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

पोलिसांनी शेतात चारही बाजूनी घेराव घातला. घटनास्थळी नशेत बेधुंद असलेले तरूण तरुणी डीजेच्या लावून डान्स करीत होते. यात एक परदेशी तरूणीही होती. फिनलँडची ही तरूणीही शुद्धीत नव्हती. अनेक जण अत्यंत बेशुद्ध अवस्थेत होते.

घटनास्थळी अफू, चरस आणि हेरोइन तसेच मोठ्या प्रमाणात दारू सापडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *