दाक्षिणात्य अभिनेत्री गायत्री उर्फ ​​डॉली डिक्रूझचं भीषण कार अपघातात निधन

दाक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूझचा शुक्रवारी एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. यावेळी गायत्रीसोबत तिचा एक मित्र होता. हे दोघेही होळीच्या पार्टीतून घरी जात होते. यावेळी हा अपघात झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायत्रीचा मित्र राठोड कार चालवत होता. तर, हैदराबादच्या गाचीबोवली भागात त्यांच्या कारला अपघात झाला. कार वेगात होती आणि राठोडचे गाडीवर असलेले नियंत्रण सुटले. कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकून गाडी पलटली. हा अपघात इतका भीषण होता की गायत्रीचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *